*संपूर्ण पुर्णा तालुकाओला दुष्काळ जाहिर करा-आ.डॉ. रत्नाकर गुट्टइ
पुर्णाप्रतिनिधी गेल्या पंधरा दिवसापासून जिल्हभरात होत असलेल्या अतिवृष्टीने शेतकर्यांच्या हातीतोंडी आलेल्या पिकांची प्रचंड प्रमाणात नासाडी केली असून शेतकर्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने संपूर्ण पुर्णा तालुका ओला दुष्काळ जाहिर करावा, अशी मागणी आ. डाँ.रत्नाकर गुट्टे यांनी केलीआहे. शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन त्यांना तात्काळ मदत करावी अशा मागणीचे निवेदन आमदार गुट्टे यांनी प्रशासनाला दिले होते त्या पत्राची दखल घेत जिल्हाधिाकर्यांनी कालअतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत. आमदार गुट्टे यांच्या मागणीवरुन नुकसान भरपाई मिळणार आहे मात्र जिल्ह्यातील सरसगट शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असल्यानं जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करावा अशी मागणी त्यांनी केली. बुधवारी आमदार गुट्टे यांनी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, तलाठी यांना सोबत घेऊन संपूर्ण पुर्णा तालुक्याचा दौरा केला तालुक्यातील ,काळेधानोरा, हटकरवाडी,ताडकळस,धनगर टाकळी,गौर,नरापुर,कावलगाव,चुडावा,बरबडी,सुहागन,आवई ,देगाव आदी गावातील प्रत्यक्ष शेतकर्याच्या बांधावर जावून पाहणी केली तहसीलदारांना पंचनामे करण्याचे आदेश दिले.अनेक शेतकर्यांचे प्रश्नही त्यांनी ऐकून घेतले तहसील कार्यालयात संबंधित अधिकार्यांची आढावा बैठक घेत नुकसानग्रस्त एकही शेतकरी वंचित राहू नये, अशा प्रकारच्या सूचना आमदार गुट्टे यांनी केल्या आहेत बैठकीला तहसीलदार वंदना मस्के,तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, सर्व तलाठी उपस्थित होते.यावेळी रासपचे जिल्हा अध्यक्ष अँड संदीप अळनुरे, मित्रमंडळाचे पालम,पुर्णा प्रभारी माधवराव गायकवाड, तालुका अध्यक्ष गणेश कदम शेख रहीम शेख चांद,रासप तालुका अध्यक्ष गजानन माने,जुनेद कादरी, सुभाष देसाई, बापुराव डुकरे,नारायण दधाटे,असदखाँ पठाण, सय्यद असिफ,भगवान सीरसकर,ताहेरखाँ पठाण असलम खान पठाण, माजी नगरसेवक मगदूम कुरेशी पिरखाँ पठाण, शेख मुसा,मोहीते,रत्नाकर सुर्यवंशी,जगन्नाथ रेनगडे, हारी सुर्यवंशी, शरद जोगदंड आकाश अहिरे चंद्रकांत मोरे, शेख सलीमआदी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, जिल्हाभरात गेल्या पंधरा दिवसात झालेल्या अतिवृष्टीने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या बाबत प्रथम आमदार गुट्टे यांनी प्रशासनाशी पत्रव्यवहार करुन नुकसान भरपाई द्यावी व ओला दुष्काळ जाहिर करुन शेतकर्यांना मदत करावी अशी मागणी प्रथम त्यांनी केल्यामुळे मतदारसंघातील शेतकर्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.