संजय गांधी निराधार समितीच्या सदस्य पदी ; राष्ट्रवादी चे युवा नेते शेख मन्सुर यांची निवड!
गेवराई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या शिफारशी नुसार बीड जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार गेवराई तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती गठीत करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व सामाजीक कार्यकरते शेख मन्सुर यांची संजय गांधी निराधार समितीच्या सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. मा.आ.आमरसिंह पंडीत व मा.जि.प.विजयसिंह पंडीत यांनी एक सर्व साधारन घरातील युवकाला गोर गरीब लोकांच्या कामे आडचन निर्माण होवु नये म्हणुन एक मोठी जबाबदारी दिली आहे आसे बोलले जात आहे.व त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आसे दिसुन येत आहे.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी तात्काळ निराधार समिती गठीत केली आहे. समिती गठीत केल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झाले आहेत. नूतन अध्यक्ष व सदस्य यांचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे, माजी आमदार अमरसिंह पंडित, मा.जि.प.आधक्ष विजयसिंह पंडित,यांनी सर्वसाधारन घराण्यातील युवकाला मोठी जबाबदारी दिली त्याचे आभार माणले व मन्सुर शेख यांची सदस्य पदी निवड झाल्याबद्दल मित्र परिवारा कडुन आभिनंदन होत आहे.