संजय गांधी निराधार योजनेच्या चेअरमनपदी राजेभाऊ पौळ…!

परळी : संजय गांधी निराधार योजनेच्या चेअरमनपदी सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्हयाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे विश्‍वासु कार्येकर्ते राजेभाऊ यादवराव पौळ यांची निवड करण्यात आली आहे.
ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व बीड जि.प.गटनेते अजय मुंडे,न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या नेतृत्वाखाली राजकारण  व समाजकारणाात गेल्या अनेक वर्षापासुन कार्यरत आहेत गेल्या निवडणुकीत ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला विजय प्राप्त करून देण्यामध्ये त्यांचे महत्वाचे योगदान असुन पक्ष बळकट करण्यासाठीही त्यांचे मोठे कार्य आहे सिरसाळा सर्कल या भागात राजेभाऊ पौळ यांचे प्रस्थ आहे त्यांच्या सर्व कार्याची दखल घेऊन पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे सिफारस केली त्या शिफारशीनुसार राजेभाऊ पौळ यांची संजय गांधी निराधार योजनेच्या परळी तालुका चेअरमनपदी निवड करण्यात आली त्या निवडीचे नुकतेच त्यांना पत्रही प्राप्त झाले आहे
माझी निवड केल्याबदल ना.धनंजय मुंडे,युवा नेते अजय मुंडे,ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे राजेभाऊ पौळ यांनी आभार मानले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *