FEATUREDLatestNewsबीड जिल्हामहाराष्ट्र

श्री सेवा हॉस्पिटल व मानसी मेडिकलचे जि. प. गटनेते श्री. अजयजी मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन

परळी वै – तालुक्यातील सिरसाळा येथील एमबीबीएस डॉ. शाम पवार यांच्या ‘श्री सेवा’ हॉस्पिटलचे व राम काकडे यांच्या ‘मानसी मेडिकल’ उद्धघाटन आज जिल्हा परिषदेचे गटनेते श्री. अजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
परळी तालुक्यातील मोठं गाव म्हणून सिरसाळ्याचा लौकिक आहे, या भागातील लोकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने ‘श्री सेवा’ हे सुसज्ज अश्या हॉस्पिटल व मेडिकलची नितांत गरज होती. ती या हॉस्पिटल व मेडिकलच्या माध्यमातून पूर्ण होत आहे, हे हॉस्पिटल या भागातील लोकांना  अत्यंत उपयोगी पडणार आहे
‘रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा’ या ब्रीदाला अनुसरून डॉ. पवार व काकडे या भागात कार्य करतील असा विश्वास व्यक्त करून यावेळी श्री. मुंडेंनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
या वेळी सिरसाळा गावचे सरपंच श्री. राम दादा किरवले, वडवणीचे नगरसेवक सतीश बडे, वडवणीचे शहराध्यक्ष संतोष पवार, सरपंच गंपूसेठ पवार, वसंत राठोड व सिरसाळा पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *