श्रीमती सुलोचनाबाई भगवानराव दगडगुंडे यांचे निधन – राजेंद्र दगडगुंडे यांना मातृशोक

परळी : दि.३० – येथील श्रीमती सुलोचनाबाई भगवानराव दगडगुंडे यांचे आज दि.30 रोजी दुपारी पहाटे 3 वा.5 मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्यू समयी त्या 94 वर्षाच्या होत्या.क्षेत्रोपाध्याय राजेंद्र दगडगुंडे यांच्या त्या आई तर दै.सामनाचे परळी तालुका प्रतिनिधी स्वानंद पाटील यांच्या त्या आजी होत्या.

शहरातील गणेशपार येथील रहिवासी सुलोचनाबाई भगवानराव दगडगुंडे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले.अतिशय मनमिळाऊ व संयमी स्वभावामुळे त्या सर्वपरिचित होत्या. त्यांच्या पश्चात 4 मुली 1 मुलगा ,सुन नातवंडे असा परिवार आहे.कै.सुलोचनाबाई भगवानराव दगडगुंडे यांच्या पार्थिवावर शनिवार दि.30 रोजी सकाळी 10 वा. शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या निधनाने दगडगुंडे कुटुंबावर कोसळलेल्या दु:खात दै.जगमिञ परिवार सहभागी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *