शौकत पठाण यांची जिल्हा सरचिटणीस पदी निवड!

आष्टी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्याक विभागाच्या बीड जिल्हा सरचिटणीस पदी युवा नेते शौकत पठाण यांची निवड करण्यात आली आहे. अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष बरकत पठाण
यांनी दि.१५जुलै रोजी बीड येथे निवडीचे पत्र दिले. आ.संदीप शिरसागर , राष्ट्रवादी कांग्रेस अल्पसंख्यक जिल्हा उपाध्यक्ष सय्यद जफर यांच्या मर्गदर्शाना खाली निवड करण्यात आली. यावेळी राजु माळी, जफर सय्यद ‌, अबरार शेख , सतिष गव्हाणे, समिर पठाण, शिवा शेकडे, हौसराव शिरसाठ, दादा जपकर आदी उपस्थित होते.
तालुक्यातील तागडखेल येथील युवा नेते शौकत पठाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्याक विभाग आष्टी तालुका अध्यक्ष पदावर काम करताना चुनुक दाखवल्याने अल्पसंख्याक विभागाने त्यांची जिल्हा सरचिटणीस पदी निवड केली आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी संभाळून पक्षाध्यक्षा मा. खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार व राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे ध्येय , धोरणे सर्वसामान्या पर्यंत पोहचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असे पठाण यांनी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल आमदार बाळासाहेब आजबे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य सतीश शिंदे, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष डॉक्टर शिवाजी राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी, काकासाहेब शिंदे, प.स.सदस्य संदिप अस्वर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गर्जे, शहराध्यक्ष नाजिम शेख ,अक्षय हळपावत यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यांच्या निवडीचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *