शेळगाव येथील महिला कोरोना बाधीत शेळगावात संचारबंदी
सोनपेठ : मुंबई हुन आलेल्या कुटुंबातील महिलेचा अहवाल कोरोना बाधीत असल्याचा आल्याने प्रशासनाने शेळगाव येथे संचारबंदी घोषीत केली असुन .कोरोना बाधीत रुग्ण सापडल्यानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई येथुन आलेल्या ४५ वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना बाधीत असल्याचा आल्याने जिल्ह्यातील सलग पाचवा रुग्ण ही मुंबईतुन च आल्याचे स्पष्ट झाले आहे .
सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथे दि १५ रोजी काही लोक मुंबई येथुन आल्याची माहिती पोलीसांना मिळताच पोलीसांनी सदरील लोकांना सोनपेठ येथे आरोग्य तपासणी साठी आणले होते .यातील एका कुटुंबातील काही जण संशयास्पद वाटल्याने त्यांचे स्वँब तपासणी साठी पाठवुन त्यांना रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले होते.व इतरांना निवारा गृहात ठेवण्यात आले. पाठवलेल्या स्वँब पैकी पंचेचाळीस वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना बाधीत असल्याचा अहवाल दि १८ रोजी प्राप्त झाला. जिल्हाधिकारी परभणी यांनी शेळगाव प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करुन शेळगाव येथे संचारबंदी जाहीर केली आहे.
सदरील महिलेचा अहवाल आल्यानंतर तालुका प्रशासनाने तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन करण्यात येणाऱ्या उपाय योजनांचा आढावा घेतला. महिलेच्या संपर्कात आलेल्यांना रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे.
शेळगाव येथे घरोघर सर्वे करण्यात येणार
शेळगाव येथील मुंबईहुन आलेल्या महिलेचा अहवाल आल्यानंतर शेळगाव येथील प्रत्येक घराचे सर्वक्षण करण्यात येणार असुन चौदा दिवस हे सर्वेक्षण होणार आहे .
तालुक्यात मुंबई येथुन आलेल्या लोकांची संख्या प्रचंड असल्याने यात अनाधिकृत प्रवेश केलेल्या लोकांची संख्या अधिक आहे.प्रशासनाने गावोगाव सर्वे करण्याची मागणी तालुक्यातुन होत आहे.