शेतीच्या कामांना वेग


सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी)  – जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव येथे  हंगामपुर्वी पडलेल्या पावसाने दिलासा मिळाला आहे. यावर्षी तीव्र उन्हाळा असल्याने नागरिक उकाड्याने ञस्त झाले होते शेतकर्यांनी शेतातील नागरलेल्या ढेकळे कडक असल्याने वखर पाळी घालुन खरिपाकरीता शेत तयार करण्याचे काम खोळंबले. मंगळवारी रिमझिम पाऊस पडल्यामुळे पावसाने नांगरलेल्या शेतातील ढेकळे साफ करून त्यात वखर पाळी तसेच शेतातील काडी कचरा वेचुन हंगामपुर्वी मशागतीच्या कामांना, वेग आला सध्या जगभरात कोरोना व्यारसने थैमान घातल्याने सर्व नागरीक घरातच बसुन होते.मृग नक्षत्र चार दिवसावर येऊन ठेपले असून उसनवारी करून का होईना  शेतकऱ्यांना बी बियाणे खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे.रामनगर  येथे वीस ते पंचवीस खेड्याचे व्यापारी केंद्र आहे या ठिकाणी कृषी ची दुकाने मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी खरदेसाठी परिसरातील शेतकरी गर्दी करत आहे.  यावर्षी उन्हाळा कडक असल्याने नागरिक उन्हाने खुप ञस्त झाले होते परंतु मंगळवारी सायंकाळच्या दरम्यान रिमझिम पाऊस पडल्याने नागरिकांची उकाड्यापासुन सुटका झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *