शेतक-यांना तात्काळ पिककर्ज वाटप करा : खरात
जालना (प्रतिनिधी)- नोटाबंदी, कोरोना, गारपीट यामुळे शेतकरी आर्थीक संकटात सापडला असून शेतकर्यांना खरीप हंगामासाठी यावर्षी तातडीने पिक कर्ज वाटप करण्याची मागणी मा.आमदार तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते ऍड. विलास खरात यांनी जिल्हाधिकारी श्री. रविंद्र बिनवडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.याबाबत जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात ऍड. खरात यांनी म्हटले आहे की, नोटाबंदी, कोरोना, गारपीट यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शेतकर्यांच्या शेत मालाला योग्य तो बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. दरवर्षी या कालावधीत पिक कर्ज घेऊन खरीप हंगामाचा खर्च भागवत असे परंतू ऐन पेरणी कालावधीत आर्थिक संकट उद्भवू नये म्हणून जिल्हाधिकार्यांनी तात्काळ पिक कर्ज वाटपाचे संबधीत अधिकार्यांना आदेश देउन आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांना सहकार्य करावे. लॉंकडाऊनमुळे शेतकर्यांना आँनलाईन नोंदणी करूनही कापूस विक्रीसाठी अडचणी येत असून कापूस विक्री साठीही शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याकडेही श्री. खरात यांनी जिल्हाधिकार्यांचे लक्ष वेधले आहे.