शेतकर्यांचे पिककर्ज तात्काळ वाटप करा अन्यथा तिव्र आंदोलन करू- राजेश गित्ते
परळी (प्रतिनिधी): शेतकर्यांचे राष्ट्रीकृत बँकासह इतर बॅकेनेही पिककर्ज प्रलंबित ठेवले आहे ते कर्ज तात्काळ वाटप न केल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांनी दिला आहे. गेल्या तिन महिण्यापासुन शेतकर्यांचे पिककर्ज राष्ट्रीयकृत बँकांसह इतर बँकेने कर्ज वाटप करण्यास विलंब लावत आहेत यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असुन पेरण्यासाठी लोकांकडुन उसणे पैसे आणुन पेरण्या केल्या पण घेतलेल्या उसणे पैशाचा तगादा लावण्याचा शेतकर्यांना सपाटा सुरू आहे.यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहेत.सबंधित बँकेने तात्काळ कर्ज वाटप करावे अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राजेश गित्ते यांनी दिला आहे.