Uncategorized

‘शेतकरी’ गणेशमूर्ती भांडार यांचा समाज उपयोगी उपक्रम

दरवर्षीप्रमाणे नफ्यांतून करणार शेतकऱ्यांना मदत* परळी प्रतिनिधी………परळी वैजनाथ तालुक्यातील शेतकरी गणेश मूर्ती भांडार यांच्या वतीने ‘कोविड 19’ व लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधीलकीतुन व जाणिवेतून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीगणेश मूर्ती विक्री मधून होणाऱ्या नफ्यांतून अडचणींचा सामना करत असलेल्या शेतकरी बांधवांना मदत करणार आहेत. शेतकरी गणेश मूर्ती भांडार येथील श्रीगणेश मूर्ती ह्या सुबक, आकर्षक, मजबूत, व जिवंतमूर्तीची एक अतिशय सुंदर, सुरेख व उत्तम कलाकुसर म्हणून परळी शहरात व तालुक्यात सर्वत्र प्रसिद्ध व अत्यंत वाजवी दरात उपलब्ध आहेत. पर्यावरण पूरक गणेश मूर्ती यावर्षी शाडो माती व विविध प्रकारच्या माती व गायींच्या गौमूत्र व शेणापासून बनवलेल्या पर्यावरण पुरक गणेश मूर्ती ही उपलब्ध केल्या आहेत. ज्या गणेश भक्तांना श्री गणेशमूर्ती हव्या असतील त्यांनी संपर्क साधावा शेतकरी गणेशमूर्ती भांडार. ना. पंकजाताई मुंडे कार्यालयाच्या उजव्या बाजूस परळी वैजनाथ. योगेश पांडकर- 9823775044, श्रीकांत म्हाळगी- 9075146953, कृष्णा मिरगे 7775855888 यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *