Uncategorizedजालना

शिवसंग्रामच्या पुढाकाराने शासकीय मका खरेदी केंद्र सुरू

देऊळगांवराजा (प्रतिनिधी) – शासकीय हमी भावाने मका खरेदी करण्यासाठी शिवसंग्राम संघटनेने दिलेल्या निवेदनाची दखल घेत १३ जून रोजी देऊळगांवराजा येथे मका हमी भाव खरेदी केंद्राचा शुभारंभ तहसीलदार सारिका भगत यांच्याहस्ते करण्यात आल्याने देऊळगांवराजा तालुक्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या  तोंडावर दिलासा मिळाला आहे.   बाजरात मका या पिकाला १००० रुपये सुध्दा भाव नाही.केंद्र शासनाने मका या पिकास १७६० रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर करून मका हमी भाव केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले होते.मात्र राज्य शासनाकडे बारदाना उपलब्ध नसल्याने वेळेत मका हमी भाव केंद्र सुरू होऊ शकले नाही.परिणामी नोंदणी करून देखील शेतकऱ्यांची मका घरातच पडून आहे.व्यापारी बाजारात कमी भावाने शेतकऱ्यांची मका खरेदी करत आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आहे.त्यामुळे शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी मका खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी ८ जून रोजी तहसीलदारांना निवेदन दिले होते.सदर निवेदनात पाच दिवसात मका खरेदी केंद्र सुरू करा,अन्यथा ठिय्या आंदोलन करू असा इशारा देण्यात आला होता.सदर निवेदनाची दखल घेत आज तहसीलदार सारिका भगत यांनी मका हमी भाव केंद्राचा शुभारंभ केला असून शेतकऱ्यांकडील बरदाण्यात मका खरेदीस सुरवात झाली आहे.यावेळी तालुका खरेदी विक्री संस्थचे अध्यक्ष वा.द.वानखेडे,सहाय्यक निबंधक जगदाळे,शिवसंग्राम चे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे,जहीर पठाण,गोडावून किपर जाधव,ग्रेडर भगवान खरात,व्यवस्थापक गायकवाड,राजू पठाण आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *