LatestNewsबीड जिल्हा

शिरूर जवळ अपघात ; शिक्षकाचा मृत्यू

शिरूर : रायमोह ते शिरूर रस्त्यावर रविवारी (ता.१४) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास टाटा सूमो आणि स्विफ्टचा अपघात झाला. या अपघातात प्रशांत कुलकर्णी (शिक्षक) यांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.

रायमोह ते शिरूर रस्त्यावर तागडगाव फाट्याजवळ आज रात्री ८.३० दरम्यान टाटा सूमो आणि स्विफ्टची धड़क होऊन जबर अपघात झाला. या अपघातात वारणी येथील शाळेवर कार्यरत असणारे मात्र, सध्या बीड येथील प्रगती विद्यालयात डेपोटेशनवर असणारे प्रशांत डी.कुलकर्णी हे शिक्षक जागीच ठार झाले आहेत. तर तीन जन जबर जखमी झाले आहेत. जखमींची नावे समजली नाहीत.जखमींना शिरूर पोलीस ठाण्याचे जमादार अशोक शेळके यानी घटनास्थळी तात्काळ जाऊन जखमींना बीड येथील रुग्णालयात हलवले आणि पाटोदा पोलिसांना माहिती दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रायमोहा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. सायंकाळी ड्युटी करून बीडला येत असतानाच हा अपघात झाला बीड येथील गुरुकुल शाळेजवळ राहतात,त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली व भाऊ आई वडील असा परिवार आहे ते मूळचे लहुरी ता केज येथील रहिवाशी आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *