शिक्षक जब्बार शेख यांच्या कुटुंबीयांना ५० लाखाचा संरक्षण विमा तात्काळ मंजूर करावा ; मुप्टा उर्दु शिक्षक संघटना बीड जिल्हा यांची मागणी !!
परळी : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर दिलेले कर्तव्य बजावत आसतानाच कोरोनाची लागण होऊन मृत्यू पावलेले शिक्षक जब्बार शेख ( प्रा प ,जि प उर्दू प्रा शा सिरसाला ता परळी वै) यांच्या कुंटूबीयांना ५० लाख रुपये विमा संरक्षण कवचाचा लाभ त्वरीत देण्यात यावा अशी मागणी मा उद्धवजी ठाकरे साहेब,(मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य),मा धनंजय मुंडे साहेब (समाज कल्याण मंत्री तथा पालकमंत्री बीड) यांना मुप्टा उर्दु शिक्षक संघटनाने मा जिल्हाधिकारी साहेब बीड यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्य शासना कडे मुप्टा उर्दु शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी यांनी केली आहे.व सदरील निवेदन मा मुख्यकार्यकारी साहेब जि प बीड व मा शिक्षणाधिकारी साहेब (प्रा) बीड यांना देण्यात आले आहे
कोवीड-१९ चे कर्तव्य बजावताना राज्यातील कर्मचाऱ्यांना कोरोनाने मृत्यू आल्यावर त्यांना ५० लाखाचे विमा संरक्षण कवच त्याचा लाभ कोरोनाचे कर्तव्य बजावत आसतानाच कोरोनाची लागण होऊन मृत्यू पावलेले शिक्षक जब्बार शेख यांच्या कुंटूबीयांना तात्काळ देण्यात यावा अशी मागणी संघटनेच्या वतीने शाहेद कादरी सर (राज्य सचिव मुप्टा उर्दु शिक्षक संघटना), शेख समीर सर( बीड जि कार्यअध्यक्ष), उमर चिशती सर (परळी ता अध्यक्ष) ,युनुस सर (तालूका अध्यक्ष माजलगाव )सय्यद अरफात ( बीड तालुका जिल्हाध्यक), नजीब सर(वडवणी ता अध्यक्ष)सय्यद अबरार सर , अनवर मसरूर सर यांनी दिलीआहे.