शिक्षकांकडून घरपोच जीवनावश्यक वस्तू वाटपासारखी कामे करून घेतली जाणार नाहीत – तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांचे आश्वासन
परळी : शिक्षकाकडून घरपोच किराणा सामन व जीवनावश्यक वस्तू वाटपा सारखे कामे करून घेतली जाणार नाहीत. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली जाईल असे आश्वासन तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांनी दिले आसल्याची माहिती म.शि.संघाचे ता.सचिव बंडू अघाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,परळी येथील भिमनगर व जगतकर गल्ली या ठिकाणी कोरोना पाँझिटीव्ह रुग्ण सापडल्याने हा भाग कंटनमेन्ट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. म्हणून या भागातील नागरिकांना दररोज लागणाऱ्या जीवनावश्यक व इतर वस्तूंची माहिती घेण्यासाठी व त्यांचा पुरवठा करण्यासाठी काही शिक्षकांच्या नेमणुकांचे आदेश परळी तहसीलदार यांनी काढले आहेत.असी दर्जाहीन ,अशोभणीय कामे शिक्षकांकडून करून घेणे म्हणजे शिक्षकांची समाजा व विद्यार्थ्यांसमोर अवेहलना, प्रतारणा करणे होय.म्हणून सदरील शिक्षक हे याबाबतची माहिती देण्यासाठी व यातून सुटका करून घेण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष पी.एस.घाडगे यांना भेटले. व या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली. सदर अशोभणीय कामे शिक्षकाकडून करून न घेता त्यांना त्यांच्या दर्जा व योग्यजतेनुसारच कामे कोवीड-१९ च्या पार्श्वभूमीवर देण्यात यावीत यासाठी घाडगे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघाचे शिष्टमंडळाने तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.यावेळी तहसीलदार यांनी यापुढे अशी कामे शिक्षकांना दिली जाणार नाहीत. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली जाईल असे आश्वासन शिष्टमंडळास दिले आसल्याचे अघाव यांनी प्रसिद्धीस दिले आहे. यावेळी नायब तहसिलदार रूपनर साहेब व गटशिक्षणाधिकारी गिरी साहेब उपस्थित होते. शिष्टमंडळात मरावाडा शिक्षक संघाचे ता.सचिव बंडू अघाव यांच्यासह संबंधीत शिक्षक विलास रोडे,बी.एस.राठोड, रामदास दराडे, शौकत पठाण, एस.बी.डोंगरे, डी.टी.सोनवणे सहभागी झाले होते.