शाहूनगर भागात गेल्या १५ दिवसापुर्वी झालेल्या नवीन रस्त्यामध्ये भेगा, लवकर दुरुस्त करा ; शेख मेहराज

बीड : शहरातील शाहूनगर भागातील आझादनगर मधील प्रभाग क्र . 9 मध्ये नगर पालिकेच्या वतीने सिमेंट काँक्रीट रस्त्याचे कामे करण्यात आलेली आहे . गेल्या १५ दिवसापुर्वी झालेले नवीन रस्त्यामध्ये भेगा पडल्या असून जागोजागी खड्डे ही झाले आहेत . याचा सर्वसामान्य नागरिकाना त्रास सहन करावा लागत असून लाखो रूपयाचे कामे बोगस झाली असल्याचेही बोलले जात असून शाहूनगर ते अश्वीनी हॉटेल दरम्यान रस्त्याचे काम अपूर्ण असून यामुळे ही सर्वसामान्य वाहनधारकाना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे . उखडलेले रस्ते तसेच भेगा पडलेले रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष शेख मेहराज यानी केली आहे . शहरातील विविध भागात नाली , रस्ते याचे नगर पालिकेच्यावतीने कामे सुरू आहेत . मात्र गुतेदाराच्या मनमानी कारभारामुळे दाहीन कामे होत नसल्याची ओरड होवू लागली आहे . शाहु नगर भागातील आझाद नगर येथेही रस्त्याची कामे गेल्या १५ दिवसापुर्वी झालेली आहेत . मात्र रस्त्याच्या मधोमधी भेगा पडल्या असून अनेक ठिकाणी कामही अर्धवट आहे . रस्त्यामध्ये पडलेल्या भेगा पाहता कामाचा दर्जा लक्षात येतो . अनेक वर्षांनतर याठिकाणी रस्ता झाला असून तोही बोगस करण्यात आला असल्याची भावना परिसरातील नागरिकाच्या मनात होत आहे . आझाद नगर भागातील तसेच शाहुनगर ते आश्वनी हॉटेल दरम्यान असलेला रस्ता पूर्ण करावा तसेच भेगा पडलेल्या रस्त्यावर केमीकलचा वापर करून भेगा बंद करण्यात याने अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष शेख मेहराज यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *