शासनाच्या आदेशाचे आधिन राहून गणेश उत्सव साधेपणाने साजरा करावे -मान्टे
कुंडलवाडी प्रतिनिधी सध्या कोरोनाचा पार्श्वभूमीवर शासनातर्फे 11 जुलै 2020 रोजी केलेल्या मार्गदर्शन सुचना तसेच 8 ऑगस्ट 2020 रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या सुचना,आदेशा प्रमाणे कुंडलवाडी पोलिस ठाणे हद्दीतील सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष व समित्या गणेश उत्सव साधेपणाने साजरा करावे अशी सुचना सपोनी.सुरेश मान्टे यांनी केले.दि.19 ऑगस्ट रोजी येथील नगर परिषद कार्यालयात पोलीस ठाणे तर्फे गणेश उत्सव निमित आयोजित शांतता समितीच्या बैठकीत मंडळाचा अध्यक्ष व सदस्याना केले. या शांतता समितीच्या बैठकीचे अध्यक्ष न.प.उपाध्यक्ष डाॅ.विठ्ठल कुडमूलवार, प्रमुख पाहूणे बिलोली तहसीलचे नायब तहसीलदार रघुनाथसिह चव्हाण,मुख्याधिकारी जी.एस.पेन्टे,सपोनी.सुरेश मान्टे,सपोउनी. विशाल सुर्यवंशी आदी उपस्थित होते. पुढे सुचना वजा मार्गदर्शन करताना मान्टे म्हणाले.सध्या कोविड 19 चा पार्श्वभूमीवर कोणतेही गणेश मंडळानी,संस्थानी पुर्व परवानगी घेवूनच मुर्तीची स्थापना करावे.बगैर परवानगी कोणीही मूर्तीची स्थापना करूनये.सार्वजनिक गणेश मूर्तीही 4 फूट व घरगुती गणेश मूर्ती 2 फूट उंचीची असावी.कोरोना आजाराचा पार्श्वभूमीवर गणेश उत्सव साधेपणाने साजरा करावे.वाईटींग,मंडप,टेपरिकाॅडिंग व भक्त बागपण करूनये.गणेशाचे आगमन व विसर्जन करीत असताना ढोल ताशा मिरवणूक करता येणार नाही.गणपतीची पुजा,आरती,किर्तन,भजन करीत असताना वरिल मार्गदर्शन सुचनांचे पालन करावे.तसेच सांस्कृतिक कार्यक्रम ऐवजी,कोरोना,मलेरीया,डेंग्यू इत्यादी आजारा बाबत जनजागृती करावी.मंडपात येणा-या प्रत्येक व्यक्तीचे थर्मलगणने स्काॅनींग करावे,मंडप व परिसर निरजंतूकरण करावे,शारीरिक अंतर व स्वच्छतेचा नियमांचे भान ठेवून उत्सव साजरा करावे.वर्गणी/ देणगी कोणी स्वईच्छेने देत असेलतर ते स्विकारावे जबरदस्ती करूनये.कोरोना आजाराचा प्रसार होणार नाही.यासाठी आवश्यकती काळजी घ्यावी इत्यादी सुचना देण्यात आले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात कुंडलवाडी,माचनूर,पिंळगाव,चिरली,गुजरी,हुनगुंदा,अर्जापूर,हरनाळी,दौलापूर,कोटग्याळ आदी सह पोलीस ठाणे हद्दीतील गणेश मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.