शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा परळीतील गरजू विद्यार्थ्यांसाठी पुस्तक रथाचा स्तुत्य उपक्रम
पुस्तकरथ
परळी : लॉकडाउन च्या काळात शालेय पुस्तके छपाई मंदावली आहे त्या अनुषंगाने राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस परळीच्या वतीने पुस्तकरथ तयार केला असून हे वाहन परळी शहरातील प्रत्येक घरोघरी जावून मराठी,ईंग्रजी,उर्दू,सेमी ईंग्रजी माध्यमांची पहिली ते बारावी पर्यंतची पुस्तके संकलित करीत आहे आज या पुस्तक संकलन उपक्रमाचा आरंभ करण्यात आला,सोशल डिस्टन्सिंग चा नियम पाळून विद्यार्थी आणी पालकांनी सामाजिक बांधिलकी दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला,पुढील दहा दिवस हा उपक्रम अविरत सुरु राहणार असून सर्व पुस्तके संकलित करुन त्यांचे बाईंडिंग करुन गरजू विद्यार्थ्यांना वितरित केले जाणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस चे सचिव अनंत इंगळे यांनी दैनिक जगमिञ च्या प्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली.