शरीर सौष्ठव स्पर्धेत ऋषीकेश फड दुसरा सिल्व्हर मेडल पटकावून मारली बाजी
परळी (प्रतिनिधी)
औरंगाबाद येथे पार पडलेल्या मराठवाडा स्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत परळी येथील ऋषीकेश बाबासाहेब फड याने 55 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या यशाने परळीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
औरंगाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत परळी येथील ऋषीकेश फड याने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. 55 किलो गटामध्ये त्याने हे यश मिळविले आहे. यापूर्वीही अनेक स्पर्धेत ऋषीकेशने असे नेत्रदिपक यश मिळविलेले आहे. त्याचा औरंगाबाद येथे सत्कार करण्यात आला असून या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.