शब-ए-कद्र ची नमाज घरी अदा करा-सोनपेठ पोलिसांचे आवाहन
सोनपेठ/मंजूर मूल्ला : कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने संपूर्ण देशात सर्व समाजातील धार्मिक कार्यक्रमाला बंदी घातली असून दि.२०मे बुधवार रोजी रमजान महिन्यातील शबे ए कद्र ची नमाज हि आपापल्या घरीच पठन करण्याचे आवाहन सोनपेठ पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी मुस्लिम बाधंवाना केले आहे. . मुस्लिम धर्मात रमजानचा महिना हा पवित्र महिना मानला जात असून या महिन्यात पवित्र कुराणाचे अवतरण झाल्याचे मुस्लिम समाजात म्हटले जाते या महिन्यातील २६ वा रोजा हा रमजान चा महत्त्वपूर्ण असा एक दिवस असून या महिन्यात रात्रभर तराविहच्या नमाजात पवित्र कुराणाची तिलावत केली जाते
म्हणून या दीवसाच्य रात्री ला शब ए कद्र साजरी केली जाते.परंतु यावर्षी कोरोना संसर्ग मुळे शासनाने सर्व प्रार्थनास्थळात धार्मिक कार्यक्रम न करण्यासाठी जमावबंदीचे आदेश दिल्यामुळे मुस्लिम बाधंवानी शबे ए कद्र ची हि नमाज आपापल्या घरीच अदा करून आल्लाकडे प्रार्थना करावी की हा कोरोना आजार संम्पुर्ण जगातुन नष्ट करावा यासाठी अल्लाकडे साकडे घालावे असे अवाहन सोनपेठ पोनि.गजानन भातलवंडे यांनी मुस्लिम बाधंवाना केले आहे.