FEATUREDLatestNewsइतरबीड जिल्हामहाराष्ट्र

व्यंकय्या नायडूंनी घोषणेला केला प्रतिबंध : परळीतून राष्ट्रवादी काँग्रेसची “जय भवानी- जय शिवाजी” घोषणेची पत्रं मोहीम सुरू

परळी वैजनाथ/ प्रतिनिधी… उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी नविन राज्यसभा सदस्यांना सभागृहात शपथ घेतल्यानंतर देण्यात आलेल्या जय भवानी जय शिवाजी घोषणेला प्रतिबंध केला.याचा निषेध व्यक्त करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना “जय भवानी जय शिवाजी” लिहिलेली ११हजार पत्रं परळीतून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पाठविणार आहे या पत्रं मोहीमेला आज (दि.२४) सुरुवात करण्यात आली आहे. राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्य यांनी शपथ घेतली व त्यानंतर जय भवानी जय शिवाजी ही घोषणा दिली.नेमके या घोषणेने तिळपापड झालेल्या व छत्रपतींच्या विषयी प्रेमाचा दिखाऊपणा करणार्या भाजपाच्या व्यंकय्या नायडूंनी ” हे माझे चेंबर आहे . इथे बाकीच्या घोषणा चालणार नाहीत. तुम्ही नवीन आहात पुढच्या वेळी लक्षात ठेवा” असे सुनावले. भाजपची छत्रपतींच्या बद्दल असलेली खोटी भावना यातून स्पष्ट दिसली. निवडणूक आली की ‘छत्रपतींचा आशिर्वाद’ म्हणत केवळ मतांसाठी छत्रपतींच्या विषयी बेगडी प्रेम भाजप दाखवते. या पार्श्वभुमीवर छत्रपतींच्या विषयी असलेल्या लाखोंच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून व भाजपला आणि त्यांच्या नेत्यांना जाणीव करून देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना “जय भवानी जय शिवाजी” लिहिलेली ११हजार पत्रं राष्ट्रवादी काँग्रेस पाठविणार आहे. या पत्रं मोहीमेला आज सुरुवात करण्यात आली आहे. सोशल डिस्टंन्सिंग पाळत एकाचवेळी मोठ्यासमुहाने ही मोहीम न राबवता टप्प्याने ११हजार पत्रं पोस्ट करण्यात येणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, प्रा.डॉ.विनोद जगतकर,संतोष शिंदे,सय्यद सिराज,महादेव रोडे,के.डी.उपाडे,डी.जी.मस्के,रवी मुळे, शंकर कापसे,ऍड.सुरेश शिरसाठ, अतुल फड,बळीराम नागरगोजे, प्रताप समीनदरसवळे,रमेश मस्के,धम्मा जगतकर, बालाजी मस्के आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *