Newsबीड जिल्हा

वैद्यनाथ बँकेने जपली सामाजीक बांधीलकी , कोरोनाच्या महासंकटात विविध स्वरूपात केली जातेय मदत

परळी : देशाचे मा . पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी देशाला उद्देशुन कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी दि . २२ . ०३ . २०२० पासून देश भरात संचारबंदी , लॉकडाऊन करुन जनतेला घरात राहण्याचे आवाहन केले होते . यास अनुसरुन महाराष्ट्र राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा व त्याची नियमावली निर्गमीत केली आहे व त्यास अनुसरुन राज्यात संचारबंदी व लॉकडाऊनचे नियम अंमलात आले . ज्या त्या जिल्हयाच्या कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव पाहता संबंधीत मा . जिल्हाधिकारी यांनी ज्या त्या जिल्हयात प्रार्दुभाव रोखण्यासाठी उपाय योजना अंमलात आणलेल्या आहेत . देशात व महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात झालेला आहे . कोरोना ग्रस्त रुग्णांचा उपचार हा सरकार मार्फत केला जात आहे . तसेच ज्या त्या राज्यात शहर , गांव स्तरावर संशयीत व्यक्तीना विलगीकरण कक्षात देखरेखीखाली ठेऊन त्यांची जेवण , राहण्याची व्यवस्था सरकार करत आहे . शहर , गांव परिसरात कोरोना विषाणू पसरू नये म्हणून निर्जुतूकीकरण वेळोवेळी सरकार मार्फत करण्यात येत आहे . या सर्व बाबींचा विचार करुन बँकेचे मा . चेअरमन , मा . व्हाईस चेअरमन व सर्व संचालक यांनी एक सामाजीक बांधिलकी जपत कोरोना विरुध्दच्या लढाईत भारतात लॉकडाऊनमुळे मोठे आर्थिक संकट उभे रहात असल्याने मा . पंतप्रधान यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत वैद्यनाथ बँकेच्यावतीने मा . पंतप्रधान सहाय्यता निधीस ( पी . एम . केअर्स ) ला बँकेच्यावतीने रु . ४ . ०० लाख रुपयांची तर मा . मुख्यमंत्री सहाव्यता निधीस ( चिफ मिनीस्टर रिलीफ फंड कोवीड – १९ ) ला रु . ३ . ०० लाख आर्थिक मदतीचे चेक परळी – वै . चे मा . तहसीलदार श्री विपीन पाटील साहेब यांच्याकडे सोपविण्यात आले . यावेळी बँकेचे चेअरमन मा . श्री अशोकजी जैन , व्हाईस चेअरमन मा . श्री विनोदजी सामत , जेष्ठ संचालक मा . श्री विकासराव डुबे , संचालक मा . श्री नारायणराव सातपुते , मा . श्री प्रकाशराव जोशी , मा . श्री महेश्वरआप्पा निर्मळे , मा . श्री संदीपजी लाहोटी , मा . श्री रमेशराव कराड , मा . प्रा . श्री दासुजी वाघमारे , मा . श्री अनिलजी तांदळे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनोदजी खर्चे, कर्मचारी प्रतिनिधी श्री गोपालजी पोरवाल, श्री दिनेशजी बरदाळे हे उपस्थित होते . आरोग्यदुत म्हणजेच डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून या पेशंटचा उपचार करत आहेत . ही महत्वाची बाब लक्षात घेऊन डॉक्टर / स्टाफ करीता रु . १ . ०० लाख पर्यंतचे पी . पी . ई . सुरक्षा किट ६० नग , मास्क १०० नग व सॅनीटायझर हे परळी येथील ग्रामीण रुग्णालय येथे देण्यात आले . याचबरोबर मा . गोपिनाथ मुंडे प्रतिष्ठान यांच्यावतीने गरजवतांना जीवनावश्यक किराणा साहित्याचे पॅकेट तयार करुन वितरण करण्यात येत असल्याने वैद्यनाथ बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्यावतीने एक दिवसाचे वेतन रु . ३ , ३० , ००० / – च्या आर्थिक मदतीचा चेक मा . गोपिनाथ मुंडे प्रतिष्ठान चे प्रतिनिधी श्री सुरेश गिरडे यांच्याकडे बँकेचे पदाधिकारी / अधिकारी यांच्याहस्ते देण्यात आला.  लॉकडाऊन च्या काळात परळी शहर परिसरातील गोरगरीब फिरस्ती मजुर , वैद्यनाथ मंदीर परिसरातील गरजवतांना ज्यांचे जिवनमान अत्यंत हलाकीचे आहे अशा ३०० लोकांना रोजच्या दोन वेळेसच्या जेवणांचे पॅकेट हे अन्नपुर्णा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मार्फत तयार करुन बँकेकडून देण्यात येत आहेत . व तसेच परळी शहर व परिसरात संचारबंदी काळात कर्तव्यावर असलेले एस.आर.पी.एफ / होमगार्ड, यांना त्यांच्या नियुक्त पॉईन्टवर तीन वेळेस चहाची व्यवस्था व तसेच त्यांना दोन वेळेसचे जेवण हे बँकेव्दारे अन्नपुर्णा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मार्फत पुरवण्यात येत आहे . दि वैद्यनाथ अर्बन को – ऑप . बँक लि . , परळी – वै . ही बँक सामाजीक जाणीव जपत , संकट काळात पीडीतांच्या मदतीसाठी कायम तत्पर असते . याची प्रचीती पुन्हा एकदा या सर्व बाबीवरुन दिसून येत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *