वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांची कर्तव्यनिष्ठा

परळी/प्रतिनिधी

मध्यरात्रीचे जवळपास 12 वाजले, जुन्या गाव भागात गाडीवरून एक व्यक्ती खाली पडतो आणि जखमी होतो. आसपासचे नागरिक त्याला शासकिय रूग्णालयात दाखल करतात परंतू उपचारा ऐवजी रेफर करण्यासाठी प्रयत्न चालू होते. त्यातच वैद्यकिय अधिक्षक डॉ.अरूण गुट्टे यांना ही माहिती मिळताच ते रूग्णालयात जातात, स्वतः उपचार करतात आणि रूग्ण अधिक उपचारासाठी तेथेच दाखल होतो.
ही घटना नांदुरवेस भागात राहणार्‍या व हॉटेलमध्ये काम करणार्‍या पांडुरंग मुळे यांची आहे. तो रात्री अपघातात जखमी झाला. डोळयाखाली खूप मार लागल्याने जखमीवर उपचारासोबत टाके टाकणेही गरजेचे होते. विशेष म्हणजे या रूग्णाला कोणीही नातेवाईक नसल्याने पुढे आले असून नागरिकांनीच त्याला उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल केलेे.
जखम गंभीर असल्याने व अंगावर जिथे तिथे रक्त पडल्याने काळजीचा विषय निर्माण झाला होता. एका सजग नागरिकाने डॉ.अरूण गुट्टे यांच्याशी थेट संपर्क साधला आणि मध्यरात्रीच ते रूग्णालयात दाखल झाले. थोडाही वेळ न दडवता त्यांनी जखमी रूग्णाचा उपचार सुरू केला. प्रारंभी डोळयावर लागलेला मार स्वच्छ करून लगेचच टाके देण्याचे काम डॉ.अरूण गुट्टे यांनी केले. वैद्यकिय सेवा हा डॉक्टरांचा निश्चितच धर्म आहे परंतू वेळ कोणती आहे याकडे न पाहता डॉ.अरूण गुट्टे यांनी सेवा धर्म देत त्या रूग्णाची वैद्यकिय सेवा केली आहे. हे काम एकुणच कौतुकास्पद असून डॉ.अरूण गुट्टे यांच्या या कामाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
यावेळी उपजिल्हा रूग्णालयातील यावेळी कार्यरत असलेल्या सर्वच कर्मचार्‍यांनी आवश्यक असलेले सर्व सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *