वीस वर्षांपासून निकामी असलेल्या इमारत मध्ये होणार विश्रामगृह-राम किरवले
सिरसाळा : गेल्या वीस वर्षांपासून निकामी असलेली ib म्हणजेच इन्फेक्शन बंगलो ची इमारत हि 1980 पासून ib म्हणून परिचित आहे ही जागा जलसंपदा विभाकडे होती त्यानंतर 2002 ला कृषी विभाकडे वर्ग करण्यात आली होती परंतु कृषी विभागाने या जागेची व्यवस्थित देखभाल न केल्यामुळे व वीस वर्षांपासून या जागेचा वापर कचरा, शौचालय,आदी घाण टाकण्यासाठी नागरिकांनी केलं होतं परंतु ग्रामपंचायत चे सरपंच पु राम किरवले यांनी या जागेचा चांगला उपयोग व्हावा म्हणून शासन दरबारी जागा ग्रामपंचायत कडे हॅन्ड वर्क करून घेतली व संबंधित इम्रातीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली घाण साफ सफाई करून घेतली व या इमारतीला एकदम सुशोभीकरण करून या ठिकाणी बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत विश्रामगृह तय्यार करणार असल्याचे सांगितले आहे तरी संबंधित जागेचा वापर भविष्यात ग्रापंचायतच्या उत्पन्न वाढीसाठी होणार असल्याचे या वेळी सरपंच राम किरवले यांनी म्हटले आहे सरपंच पदाचे सूत्रे घेतल्यानंतर किरवले यांनी अवघ्या चार महिन्यातच गावचे व पाण्याचे नियोजन चांगल्या प्रकारे लावल्यामुळे सरपंच यांची सर्वत्र वाह वाह होत आहे