विना मास्क व दुचाकीवरून डबलसीट प्रवास करण्या-यावर नगरपरिषद व पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई
कुंडलवाडी (प्रतिनिधी) – कुंडलवाडी येथे दि.7 जूलै मंगळवार रोजी कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील मुख्यबाजारात,डाॅ.हेडगेवार चौकात पालीका प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त रित्या कारवाई करीत विना मास्क,डब्लसीट गाडी चालवना-या प्रत्येकी 200 प्रमाणे 32 जनांवर दंडात्मक कारवाई करीत 6 हजार 500 रू.दंड वसूल करण्यात आले आहे. शासनाच्या वतीने कोरोना अनलाॅक प्रक्रिया संपूर्ण देशात चालू असतांना बिलोली तालूक्यात सह बिलोली शहरात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून कुंडलवाडी शहरातील नागरीक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पासून सुरक्षित राहावे यासाठी येथील पालीका प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने कोरोना नियमांचे उल्लंघन करणा-या नागरीकांवर दंडात्म कारवाई करण्याचे सत्र सुरू असून.या निमित्ताने मंगळवार रोजी केलेल्या कारवाईत विना मास्क,डब्लसीट गाडी चालवना-या 32 नागरीकांवर दंडात्मक कारवाई करीत 6 हजार 500 रू.दंड वसूल करण्यात आले आहे. या कारवाई मुख्याधिकारी जी.एस.पेन्टे,सपोनी.सुरेश मान्टे,सपोउनी.विशाल सुर्यवंशी नगरपरिषद कर्मचारी व पोलीस कर्मचारी आदींचा सहभाग होता.