विद्यार्थ्यांना इंटरनेट मोफत देण्याची संभाजी सेनेची मुख्यमंत्र्यांना मागणी..!!
बीड : कोरोना covid-19 या महामारी मुळे जगावर प्रचंड मोठे संकट आले आहे. त्याची झळ संपूर्ण जगाला पोहचली आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकारने ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचे जाहीर केले आहे, परंतु अशा बिकट परिस्थितीमध्ये ग्रामीण व शहरी भागातील पालक अत्यंत आर्थिक टंचाईत सापडलेला आहे अशावेळी आपल्या मुलांना अँड्रॉइड मोबाईल घेऊन देणे आणि त्यासाठी इंटरनेट पुरवणे अवघड झालेले आहे. आपल्या कुटुंबाला दोन वेळचे जेवण व्यवस्थित न देण्याची परिस्थिती अनेक कुटुंबावर आलेली आहे, अशा बिकट परिस्थितीत ज्याप्रमाणे राज्य सरकारने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत त्याचप्रमाणे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेट सेवा उपलब्ध करून द्यावी आणि आणि विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान वाचवावे अशा पद्धतीचे विनंती वजा निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हाधिकारी परभणी यांच्यामार्फत संभाजी सेनेच्या वतीने देण्यात आले आहे सदरील निवेदनावर संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन लव्हाळे शहराध्यक्ष अरुण पवार जिल्हा उपाध्यक्ष सतीश जाधव सहसंघटक संतोष मुंडलिक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत