वाशीम जिल्ह्यात २८ नवे कोरोना रुग्ण बाधित
दिपक मापारी प्रतिनिधी रिसोड दि. २७ ऑगस्ट २०२०, सायं. ६.०० वा. वाशिम : वाशीम जिल्ह्यात २८ रुग्णांची भर पडली असून शहरातील तिरुपती सिटी परिसरातील १, अनसिंग येथील १, मालेगाव शहरातील वॉर्ड क्र. सहा येथील ६, मंगरूळपीर शहरातील मंगलधाम परिसरातील २, सुभाष चौक परिसरातील २, शेलूबाजार येथील ७, लाठी येथील ५, नागी येथील१, कारंजा लाड शहरातील महावीर कॉलनी परिसरातील १, संतोषी माता कॉलनी परिसरातील १, मानकनगर परिसरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेर आणखी ९ कोरोना बाधित व्यक्तींची नोंद झाली असून जिल्ह्याबाहेर उपचार घेत असलेल्या १४ व्यक्तींना डिस्चार्ज मिळाला आहे.