वाळु चोरीस विरोध करणाऱ्या तलाठ्यास नदीत ढकलले ; तीन जण ताब्यात

सोनपेठ : गोदावरी नदीत वाळु चोरीस प्रतिबंध करणाऱ्या तलाठ्यास नदीत ढकलुन दिल्याची खळबळजनक घटना सोनपेठ तालुक्यात घडली .चाळीस किलोमीटर चा विस्तीर्ण गोदावरी किनारा लाभलेला सोनपेठ तालुका वाळु चोरीसाठी कुप्रसिद्ध आहे.सगळे जग कोरोना रोगाविरुध्द लढाई करत असतांना सोनपेठ तालुक्यात सर्रास वाळु चोरी सुरु आहे. तालुक्यातील गोदाकाठच्या अनेक गावात विविध प्रकाराने दिवसरात्र वाळु चोरण्यात येथे .माजी जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी या वाळु चोरांवर चांगलीच वचक निर्माण केली होती .सध्या लॉकडाऊन व संचारबंदी असतांना ही दि .२८ रोजी सकाळी शिर्शी येथील गोदावरी नदीच्या पात्रात काही जण बोटीच्या सहाय्याने वाळु चोरत असल्याची माहिती तलाठी सोमनाथ एकलिंगे यांना मिळाली त्यावरुन ते चोरट्यांना थांबवण्यासाठी उपसरपंच बापुराव सोळंके व कोतवाल शेवनाथ शिंदे यांच्या सोबत गोदावरी नदीत गेले असता नदीत प्रकाश पंडुरे,विकास पंडुरे व माणिक पंडुरे हे होडीने नदीच्या पाण्यातुन वाळु चोरत असल्याचे आढळुन आले .या बाबत त्यांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तलाठी एकलिंगे यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली व नदीत ढकलुन दिले .तिथे उपस्थित लोकांनी तातडीने एकलिंगे यांना नदी बाहेर काढले .या बाबत रात्री उशीरा एकलिंगे यांनी सोनपेठ पोलीसात तिघा जणाविरुध्द संचारबंदीत जमाव जमा करुन सरकारी कर्मचाऱ्यावर दबाव आणणे,शासकीय कामात अडथळा आणणे तसचे वाळु चोरी करुन धक्काबुक्की व शिवीगाळ करुन नदीत ढकलल्याची तक्रार दिली त्यावरुन सोनपेठ पोलीसांनी त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले आहे .वाळु चोरी वरुन तलाठ्यालाच नदीत ढकलुन दिल्यामुळे संपुर्ण सोनपेठ तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *