वाल्मिक अण्णा कराड यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्र.10 मध्ये विशेष लसीकरण मोहीमत आत्ता पर्यंत 2 हाजारच्या हून अधिक नागरिकांचे लसीकरण

परळी (प्रतिनिधी) -: शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये आज 12 जून रोजी पालकमंत्री ना.धनंजय मुंडे संकल्पनेतून व गटनेते वाल्मीक आन्ना काराड यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती या मोहिमेत आज 1000 च्यावर नागरिकांचे लसीकरण करण्यात आले पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात 2000 च्या वर नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व परळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या प्रयत्नातून शहरातील प्रभाग क्र. 10 मधील 45 वर्षांवरील नागरिकांसाठी आज दि.12जून रोजी दुसऱ्या टप्यातील सकाळी 9 वाजल्या पासून विवेक वर्धिनी विद्यालय, शारदा नगर येथे विशेष लसीकरण मोहीमेत 1हजारच्या वर लसी करणं करण्यात आले. पहिला टप्यात 1 हजार नागरिकाचे लसीकरण करण्यात आले, तसाच लसीकरण या कार्यक्रमात आज नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद पाहावयास मिळाला. लसीकरण केंद्रावर येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या जाण्या येण्याची व्यवस्था करण्यात आली होती, त्याचबरोबर लसीकरण केंद्रावर येणाऱ्या नागरिकांची अल्पोपहाराची सोय करण्यात आली. आज दिनांक 12 जून रोजी प्रभाग क्रमांक 10 मधील लसीकरण चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आले होते. या मोहिमेंतर्गत तसेच आज लस न मिळू शकलेल्या नागरिकांचे लवकरच तिसऱ्या टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे. यावेळी नगर सेविका प्रियांका रोडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश गित्ते,महादेव रोडे,पप्पु काळे, अभिजीत मुंडे,आबासाहेब मुंडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रल्हाद कंडुकटले, आरोग्य कर्मचारी, तसेच परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.

85 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *