वानाडोंगरी नगरपरिषदेचा अजब गजब कारभार…!
नागपूर : 300 ते 400 किट जिल्हापरिषद शाळा व नगर परिषद वानाडोंगरी मध्ये घुळ खात पडलेला आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते दादाराव मुडे यांनी केला आहे. तहसील कार्यालया मधून गोर गरिबांना धान्य वाटप करण्याकरिता वानाडोंगरी नगरपरिषदेला तहसीलमधून वाटप करण्यासाठी किट देण्यात आल्या होत्या, पण जनता त्रस्त आहे, अजूनपर्यंत काही गरिबांना किट वाटप करण्यात आलेल्या नाहीत. दादाराव मुडे यांनी आज दिंनाक 01/06/2020 कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले कि आम्हाला किट वाटप अधिकारी यांनी आम्हाला वाटणारी यादी अजूनपर्यंत दिली नाही. याकरिता धान्य नगरपरिषदेमध्ये पडलेले आहे असे सांगितले. जिल्हाघिकारी व तहसीलदार यांनी अशा कामचुकार अधिकारी यांच्यावर ताबडतोब कार्यवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दादाराव मुडे यांनी केली आहे.