Newsबीड जिल्हा

वादग्रस्त पोस्ट प्रकरणी ग्रुप अँडमीनसह तिघांवर गुन्हा दाखल…

बीड :- सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरविल्या प्रकरणी व्हाट्सअप ग्रुप ॲडमिन सह तिघांविरुद्ध पोलीस ठाणे पेठ बीड येथे गुन्हा दाखल व आरोपी नां अटक

दि.28-04-2020 रोजी पोलीस ठाणे पेठ बीड येथे गु.र.नं.122/2020 कलम 505(2),34 भा द वि प्रमाणे फेसबुक या सोशल मीडिया वरून जाणीव पूर्वक अफवा द्वारे मीडिया आणि प्रशासन यांच्या विरोधात द्वेषभाव व तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने समीर सरकार या फेसबुक अकाउंट वरून पोस्ट केली म्हणून आरोपी नामे शेख समीर शेख सत्तार वय 24 राहणार मोहम्मदिया कॉलनी पेठ बीड याच्यावर फिर्यादी पो. ना./ राहुल रतनलाल गुरखुदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच आरोपीला गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे तसेच या प्रकरणांमध्ये सदर गुन्ह्याचे फिर्यादी यांनी सांगितले की समीर सरकार या फेसबुक अकाउंट वरून तिच पोस्ट इसम नामे सय्यद खय्युम सय्यद जमीर व्हाट्सअप ग्रुप वर पोस्ट केली व त्यास ग्रुप ॲडमिन ने सहमती दिली म्हणून ग्रुप ॲडमिन नामे सलीम जावेद शेरखान या तिघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे व सदरील गुन्ह्यातील दोन्ही मोबाईल जप्त करण्यात आले आहेत पुढील तपास सपोनि के. बी. भारती हे करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *