वाघिरा गावात व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून वृक्ष लागवड ; दर १५ दिवसाला लोकवर्गणीतून देतात पाणी

पाटोदा : तालुक्यातील आदर्श असलेले वाघिरा गावात युवकांनी ‘संत सिताराम बाबा वाघिरा’ या व्हाट्सएप ग्रुप च्या माध्यमातून एकत्र येऊन एक आदर्शवत उपक्रम हाती घेतला आहे.ग्रुप मधील सदस्यांनी गेल्या वर्षी सदरील व्हाट्सएप ग्रुपवर चर्चा करून गावात झाडी लावली पाहिजेत ही कल्पना सुचविली व ती सर्व सदस्यांनी अमलात आणली देखील.

त्यानुसार गावात रस्त्याच्या कडेने वृक्षलागवड केली देखील.प्रत्येकाने एक झाड दयावे असे नियोजन झाले.झाडे मिळाली आणि ती लावली पुन्हा पाण्याची सोयीसाठी सर्वांनी सहकार्य केले.जेवढे जमेल तेवढे पैसे प्रत्येक जण त्या झाडांना पाणी घालण्यासाठी देत आहेत.

आज एवढ्या उन्हाळ्यात त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊन मध्ये देखील ती झाडे जगवली आहेत.गावाच्या निसर्गाचे जतन करण्यासाठी गावातील नागरिक खंबीरपणे उभे आहेत हेच मोठे भाग्य गावाला लाभले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *