वकिलांसाठी आर्थिक विकास महामंडळ सुरू करावे = अँड अविनाश गंडले!

बीड : कोरोणा महामारी मुळे आपल्या भारत देशामध्ये मागील सहा महिन्यापासून लॉकडाऊन असल्यामुळे महाराष्ट्रातील न्यायालयीन कामकाज सर्वत: बंद असल्यामुळे न्यायालयामध्ये साक्षी पुरावा व इतर किरकोळ कामे हे बंद आहेत.
न्यायालयीन कामकाज चालू नसल्यामुळे वकिलांची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. अनेक वकील बांधव हे वकिली व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यासाठी वकिलांच्या आर्थिक परिस्थितीला मदत व्हावी यासाठी गरजु वकिलांसाठी आर्थिक विकास महामंडळ सुरु करावे किंवा राष्ट्रीयीकृत बँकेला आदेशित करून गरजू वकिलांना रक्कम रुपये दोन लाखापर्यंत कर्ज देऊन तीन वर्षापर्यंत परतफेड मुदत देण्यात यावी व तसेच रिझर्व बँक ऑफ इंडिया यांना आदेशित करावे व वकिलांची आर्थिक परिस्थिती मुळे होणारी हेळसांड थांबवावी. तसेच गरजू वकिलांच्या सद्यःस्थितीचा विचार करता वकिलांचे अडचण लक्षात घेता आर्थिक परिस्थितीवर मात होईल या विचारसरणीतून सर्व गरजू वकील बांधवांचा विचार करून किंवा अटी व शर्ती ठेऊन, वकिलांसाठी आर्थिक विकास महामंडळ अथवा कर्ज उपलब्ध करण्यात यावे अशी मागणी राज्यपाल महाराष्ट्र राज्य, मुंबई व राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे बीड जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष अँड. श्री अविनाश गंडले यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *