लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त फिटनेस शिबिराचे आयोजन- निळकंठ चाटे .

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त भाजयुमोच्या वतिने क्रिडा क्षेत्रातील मुला- मुलींसाठी भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.11 डिसेंबर रोजी फिटनेस शिबिराचे आयोजन करण्यात येणार असुन या शिबिराचा मुला-मुलींनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजयुमो जिल्हाध्यक्ष तथा संयोजक निळकंठ चाटे यांनी केले आहे. लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांची दि.12 डिसेंबर रोजी जयंती असुन स्व.मुंडे साहेबांची जयंती सामाजीक उपक्रमांनी साजरी करण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजीत केले असुन यानिमीत्त भाजयुमोच्या वतिने दि.11 डिसेंबर रोजी शहरातील नटराज रंग मंदिर प्रांगणात क्रिडा क्षेत्रातील मुला- मुलींसाठी फिटनेस शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन या शिबीरात सहभागी होणार्या मुला- मुलींची तज्ज्ञ ट्रेनर इमरान खान यांच्या मार्फत डायट बद्दल योग्य ते मार्गदर्शन व मुला-मुलींची फिटनेस शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कोरोनाचे सर्व नियम़ाचे आमलबजावणी करण्यात येणार असुन या शिबीराचा मुला – मुलींनी सहभाग नोंदवून लाभ घ्यावा असे आवाहन भाजयुमो जिल्हाध्यक्ष तथा संयोजक निळकंठ चाटे व सर्व युवक सहकार्य यांनी केले आहे

241 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *