लॉकडाऊन ५.० ; राज्यात ‘या” गोष्टी बंदच राहणार…
मुंबई : राज्यसरकारने लॉकडाऊन ५.०ची घोषणा करताना कंटेन्मेंट झोन वगळता इतर क्षेत्रात अनेक गोष्टी शिथिल केल्या आहेत. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काही गोष्टींवर संपूर्ण राज्यात निर्बंध घालण्यात आले आहेत. मॉल्स, मेट्रो रेल्वे, शाळा-महाविद्यालये, सिनेमागृहे बंद राहणार आहेत. केंद्राने परवानगी दिली असली तरी धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत. तसं आज जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आलं आहे._
या गोष्टी राहणार बंद…
👉🏻 शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण केंद्रे आदी बंद राहतील.
👉🏻 आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद राहील. महाराष्ट्र सरकारच्या परवानगी असेल तर सुरू होईल.
👉🏻 मेट्रो रेल्वे बंद राहील.
👉🏻 सिनेमा हॉल, जिम, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृहे, बार, सभागृहे, विधानसभा सभागृह आदी बंद राहणार आहे.
👉🏻 सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमास बंदी राहणार आहे.
👉🏻 धार्मिक स्थळे आणि प्रार्थनास्थळे बंद राहतील.
👉🏻 सलून, स्पा, ब्युटी पार्लरही बंद राहणार आहे.
👉🏻 शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि इतर सेवा बंद राहतील.