लॉकडाऊन आणि जनता कर्फ्यु ही बोथट हत्यारे चालवणे बंद करा ; माजी मंत्री प्रा. सुरेश नवले

बीड : जवळपास मार्च महिण्याच्या अगोदर पासून कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. तेंव्हा पासुन आज तागायत कित्येत वेळा लॉकडाऊन होऊन आणि जनता कर्फ्यु लागु केला. कोरानो आटोक्यात आणण्याचे हे उत्तम तंत्र आहे; हे शासनाच्या आणि प्रशासनाच्या स्तरावर समजल्या गेले आणि वारंवार त्याची अंमलबजावणी केली गेली. कडक अंमलबजावणी करून देखील करोना अटोक्यात आला असे काही चित्र दिसले नाही. उलट तो वाढतच गेला. वारंवार लॉकडाऊनचा परिणाम गोरगरीब, हातावर पोट असणार्या कुटुंबाला किती वेदनादायी ठरला याची कल्पना बहुधा प्रशासनाला असावी. असे माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी म्हटले आहे. उपाशीपोटी असंख्य कुटुंबाला ‘‘चार पत्र्याखाली’’ घामाच्या धारा सहन करत काढावे लागलेले आहे. अक्षरक्षः या लॉकडाऊन मुळे असंख्य कुटुंबाची वाताहात झालेली आहे. कित्येक कुटुंबात माणसे मृत्युमुखी पडलेली आहेत सांगता कोणाला? सगळी अर्थव्यवस्था कोलमडली, व्यापार्यांचे हाल, बँकेचा तगादा, कुटुंबाची घुसमट हे सगळ्यांनी सहन केलेले आहे. लॉकडाऊनमुळे कोरोना आटोक्यात येतो हे प्रमाणित झालेले नाही. जगामध्ये आता आंदोलने सुरू आहेत की, नको तो लॉकडाऊन. ‘‘रोगापेक्षा औषध भयंकर’’ अशी स्थिती लॉकडाऊनमुळे झालेली आहे. व्यक्तीगत काळजी घेणे महत्वाचे. ते समाज आणि व्यक्तीवर अवलंबुन आहे. याचे भान प्रशासनाने ठेवावे.
लॉकडाऊन किंवा जनता कर्फ्यु बाबत प्रशासनाने विचार करत असेल तर कृपया ही बोथट झालेली हत्यारे आहेत एवढे तरी त्यांनी लक्षात ठेवावे. नसता जनता आता रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही. असे पत्रक माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी काढले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *