Uncategorized

*लॉकडाऊनमुळे खर्डे बंधूंनी व्यवसाय बदलला* *पुजा साहित्याऐवजी रेडिमेड कपड्यांची विक्री* *

परळी (प्रतिनिधी)
लॉकडाऊन संपले असले तरी अद्याप बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले वैद्यनाथ मंदिर दर्शनासाठी उघडले नसल्याने मंदिर परिसरातील पुजा साहित्य विक्री करणारे दुकाने बंदच आहेत. या पार्श्वभूमीवर पुजा साहित्य विक्री ऐवजी खर्डे बंधूंनी मोंढा परिसरात व्यवसायात बदल करून रेडिमेड गारमेंटसची विक्री व्यवसाय सुरू केला आहे.
परळी शहरातील वैद्यनाथ मंदिर परिसरात माणिकनगर भागातील रहिवाशी ज्ञानेश्वर खर्डे व रामभाऊ खर्डे यांचे पुजा साहित्य विक्रीचे दुकान मागील अनेक वर्षापासून कार्यरत आहे. लॉकडाऊनमुळे मागील काही महिन्यांपासून मंदिर बंद असून त्यामुळे पुजा साहित्य विक्री सुद्धा बंदच आहे. लॉकडाऊन उघडले असले तरी वैद्यनाथ मंदिर बंद असल्याने पुजा साहित्याची विक्री होत नाही. या पार्श्वभूमीवर खर्डे बंधूंनी मोंढा मार्केटमध्ये तयार कपड्यांच्या विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. परळी शहरात अनेकांना यामुळे रोजगार गमावण्यासोबतच व्यवसायाचे संकट झेलावे लागले. खर्डे बंधूंनी झालेला बदल लक्षात घेवून व्यवसायात व जागेतही बदल केला आहे. आम्हाला व्यवसाय जीवनावश्यक असून आम्ही हा बदल गरज म्हणून स्वीकारल्याचे खर्डे बंधूंनी सांगितले. व्यवसाय बदलला तरच आपले जीवनमान पूर्णपणे कार्यक्षमता व जीवनावश्यक होवू शकेल यामुळेच तयार कपड्यांचा व्यवसाय आम्ही सुरू केला असल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *