लॉकडाऊनमध्ये अत्यंत साध्या पद्धतीने विवाह संपन्न
जालना (प्रतिनिधी)- कोरोना आजारामुळे देश आणि राज्यामध्ये लॉकडाऊन परिस्थिती असतांना अनेक लग्न समारंभ पुढे ढकलण्यात आले असले तरी कांचननगर जालना येथे लॉकडाऊनमध्ये अत्यंत साद्या पद्धतीने चि. सौ. का. अपुर्वा प्रल्हाद राठोड यांची जेष्ठ कन्या आणि चि. योगेश विठ्ठलराव पवार या दाम्पत्यांचा विवाह त्यांच्या कुटूंबाच्या उपस्थितीत नुकताच पार पडला.
या वधू-वरांना आ. कैलास गोरंट्याल यांनी शुभ आशिर्वाद देऊन लग्न सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने पार पाडल्याबद्दल उभय कुटूंबांचे कौतूक केले. या प्रसंगी शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, ओमप्रकाश आढे, जालना युवक काँग्रेसचे अध्यक्ष अरून घडलींग आदी मान्यवर उपस्थित होते.