लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूलचा श्रेयश गुरुडे राज्यात तिसरा
बिलोली (प्रतिनिधी)= नुकत्याच घेण्यात आलेल्या श्रेया इंटेलिजंट अकॅडमी सर्च परीक्षा मध्ये बिलोली येथील लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूलचा अतिशय कुशाग्र बुद्धीचा असलेला विद्यार्थी श्रेयश बाळासाहेब गुरुडे हा शंभर पैकी 96 गुण घेऊन राज्यात तिसरा येण्याचा बहुमान मिळवला आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे आजोबा सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक बेंबडे,चिरलीचे सरपंच तथा मुख्याध्यापक अशोक दगडे, पञकार विठ्ठल चंदनकर, सायलु नरोड, बालाजी हिवराळे, शाळेच्या मुख्याध्यापिका रजनीराणी, मार्गदर्शक शिक्षिका विजया आंबटवार, आई सारीका गुरुडे, वडील बाळासाहेब गुरुडे व ताई श्रेया गुरुडे यांच्यासह अनेकांनी कौतुक केले.