*लातूर मध्ये पाण्यात बुडून बहिणीसह दोन भावाचा मृत्य*

लातूर ( जि.प्रतिनिधी ) : अहमदपूर (जि.लातूर) : अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव (शेंद्री) येथील सख्ख्या बहिण भावासह चुलत भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.तीन) घडली आहे. गणेश तुकाराम जायभाये (वय १२ ), छकुली ऊर्फ रोहिणी ज्ञानोबा जायभाये ( वय १४), बबलु ऊर्फ प्रतीक ज्ञानोबा जायभाये (वय ९) हे तिघेजण शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास आपल्या शेताच्या बाजूने वाहणाऱ्या मन्याड नदीत वाळलेल्या लाकडावर बसून खेळत होते. नेहमीच ही मुल नदीपात्रातील पाण्यात खेळतात. नेहमीप्रमाणे शनिवारीही ही मुल पाण्यात Latur लाकडावर बसून खेळत असताना लाकूड पात्रात वाहत पंधरा ते वीस फूट खोल पाण्यात गेले. नदी पात्रातील पाण्याचा अंदाज चुकल्याने लाकडी ओंडका खोल पाण्याच्या प्रवाहात गेल्याने हेलकावे बसले व पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान प्रतीक जायभाये व रोहिणी जायभाये या सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू झाला.

175 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *