लातुरच्या धर्तीवर बीड जिल्हयात दुकाने सुरू ठेवावेत-राजेश गित्ते

परळी : कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर लातुर जिल्हयाच्या धर्तीवर बीड जिल्हयातील दुकाने सुरू ठेवुन शेतकरी व नागरिकांची गैरसोय होवु नये यांची प्रशासनाने दक्षता घ्यावी अशी मागणी भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांनी केली आहे.संपर्ण देशभरात कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभुमीवर लॉकडाउन सुरू आहे परंतु बीड जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांनी मनमानी सुरू केली असुन बीड जिल्हयात एक दिवस आड बाजारपेठ सुरू असुन मात्र वेळेच्या आभावामुळे शेतकरी व नागरिकांना खरेदी करण्यासाठी मोठा अडथळा निर्माण होत आहे.रब्बीच्या पेरण्या तोंडावर आल्या असुन शेतकरयांना बि-बियाणे खते,शेतीसाठी लागणारे साहित्य बाजारपेठेत उपलब्ध असुनही त्यांना वेळेअभावी खरेदी करण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे यामुळे शेतकरी बांधवांना रिकाम्या हाताने गावाकडे जावे लागत आहे म्हणुन लातुर येथेही कोरोनाचा प्रादुर्भाव असुनही तेथिल प्रशासनाने सकाळी ८ ते २ हा वेळ बाजारपेठेच्या परिसरातील उपलब्ध करून दिला आहे त्या धर्तीवर बीड जिल्हयातही वेळ वाढवावा अशी मागणी राजेश गित्ते यांनी केली आहे

256 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *