लाँगडाऊनचा कालावधी वाढत आसल्यामुळे आंबट शौकीन परेशान

आमठाणा(प्रतिनिधी) – लाँगडाऊनची कालावधी दिवसेदिवस वाढत असल्यामुळे बोरगांव बाजार,सावखेडा, खातखेडा, म्हसला,सोनाप्पावाडी,बोरगांव सारवाणीसह ग्रामीण भागातील आंबट शौकिनाची चांगलीच अडचण होत आहे,कारण 60 रुपयाची देशी दारू 250 रुपयाना,विदेशी 120 ची बाटली 400 रुपयांना,12 रुपयाची गाय छाप 45 रुपयाना,10 रुपयाचा बार 20 रुपयाला तर सुठ्ठी तंबाखु 55 रुपये छटाक या दराने मादक पदार्थाची विक्री चालु आहे. संचार बंदीकाळात मेडीकल,दवाखाने,किराणा दुकाण वगळता सर्व व्यवसाय बंद आहे,व यामध्ये किराणा दुकानातुन तंबाखुजन्य सामान विक्री बंद राहील असे महसुल,व पोलीस विभागाकडुन परिसरातील सर्व किराणा दुकानदाराना सक्त तंबी देण्यात आली होती,परंतु किराणा दुकानात तंबाखुजन्य विक्री बंद झाली, पण परिसरातील सर्व पानटपरीधारक माञ,बसस्थानकावर, घरीबसुन वरिल सर्व तंबाखुजन्य पदार्थाची मोठ्या धाटात खुलेआम विक्री करत आहे,यामुळे परिसरात पिचकारी मारणाराच्या संख्येत मोठी वाढ झालेली दिसुन येत आहे,यामुळे कोरोना संसर्गवाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही,व यामुळे अवैध देशी-विदेशी दारू,पानमसाला,बार,तंबाखुची अवैध विक्री करणारे दररोज हजारो रुपये कमवत आहे, दुसरीकडे शेतकऱ्यांचे माल दुध,भाजीपाला,फळ,धान्याची कवडीमोल भावात विक्री होत आहे.
या प्रकरणाकडे संबधीत विभागाने जातीने लक्ष देऊन या शासनाचे नियमाचे पालन नकरणाऱ्या व अवैध रित्या तंबाखु जन्यपादर्थाची विक्री व खरेदी करणारावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी परिसरातील सुज्ञनागरीकातुन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *