लपूनछपून येऊ नका तुम्ही गुन्हेगार नाही – सरपंच धनवई
जाफ्राबाद (प्रतिनिधी)- टेंभुर्णी विनंती करण्यात येते की, बाहेर गावाहून येणाऱ्यांनो कृपया लपून – छपून येऊ नका, गावात आल्याबरोबर स्थानिक प्रशासन तलाठी ग्रामविकास अधिकारी सरपंच पोलीस यांना संपर्क करा असे आवाहनसरपंच गणेश धनवई, उपसरपंच गणेश गाडेक टेंभूर्णी यांनी केले आहे.
बाहेरगावावरून आल्याबरोबर आधी दवाखान्यात जा, तुम्ही गुन्हेगार नाहीत. तुमच्या आणि दुसऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत होण्यापेक्षा क्वॉरंटाईन होणे कधीही चांगले.स्थानिक नागरिकांना देखील सुचित करण्यात येते की त्यांनी देखील आपल्या नात्यातील (भाऊ, बहीण , मुलगा, मुलगी ) जी कोणी व्यक्ती आपल्या घरी येणार आहे अशा व्यक्तीला ग्रामपंचायतला संपर्क केल्याशिवाय आपल्या घरी येऊ देऊ नये.ज्यांना ज्यांना आपण लपून – छपून बाहेरच्या राज्यातून, जिल्ह्यातून , पुण्या -मुंबईहून आलोय म्हणजे फार मोठे कार्य केले असे वाटत असेल त्यांनी भ्रमात राहू नका . प्राथमिक आरोग्य केंद्र दवाखान्यात जाऊन तपासण्या करून घ्या… जर असे कोणी व्यक्ती आढळून आली तर त्याच्यावर ग्रामपंचायत यांच्या कडून कायदेशीर कारवाई केली जाईल. कोरोनाला नाही कळत आपण कोण आहे तेसुरक्षित राहा. घरीच राहा.