रिक्षाचालकाची मुलगी झाली बीएएमएस डॉक्टर !!
बीड : जीवनात यशाची शिखरे गाठण्याची स्वप्ने उराशी बाळगून त्या दिशेने झोपवण्यासाठी खडतर प्रवास अत्यंत धीरोदात्तपणे सोसून यशस्वी होणारे खूप कमी असतात. असेच कौतुकास्पद व प्रेरणादायी यश बीड येथील गरीब ऑटो रिक्षाचालक जावेद अत्तार यांची कन्या नाज़नीन फातिमाने मेहनत व जिद्दीच्या बळावर बीएएमएस(BAMS वैद्यकीय अभ्यासक्रम) पूर्ण करून बीडच्या अत्तार समाजामधील पहिली डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे. मनात जिद्दी असली तर काहीही शक्य होऊ शकते हे डॉ.नाजनीन फातिमाने दाखवून दिले.
नाजनीनच्या घरची आर्थिक परिस्तिथी अत्यंत हालचाली असून तिचे वडील ऑटो रिक्षाचालक आहे. एका सामान्य व गरीब कुटुंबात जन्मलेल्या नाजनीनचा प्रवास अत्यंत थक्क करणारा आहे. गरिबी व साधारण परिस्थितीमुळे हार न पत्करता स्वतःची जिद्द,परिश्रम व तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर तिने यश संपादन करून आईवडील व समाजाची मान उंचावली.
नाजनीन फातिमाच्या या यशाबद्दल “अत्तार वेलफेयर ट्रस्ट” तर्फे पुस्तके व घडी देऊन तिचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.
या वेळी डॉ नाजनीन फातिमा ने सांगितले कि आर्थिक परिस्तिथी हालचालींची असताना माझ्या वडिलांनी दिवसरात्र मेहनत करून माझ्या शिक्षणासाठी हजारो रुपये खर्च केले, शिक्षणाच्या दरम्यान मी पूर्णपणे सोशलमीडिया पासून लांब होती, मला Engineering करायची होती परंतु गरीब व गरजू लोकांची मदत करण्यासाठी मी डॉक्टर बनली.
यावेळी मिल्लिया महाविद्यालय चे डॉ इम्रान सरांनी सांगितले कि इच्छाशक्ती अन् जिद्द उराशी बाळगत प्रयत्नांची पराकाष्ठा केली की काहीच अशक्य नसतं. याचा प्रत्यय नाजनीन फातिमा हिने कृतीतुन दाखवुन दिलंय. कोरोना च्या काळात डॉ नाजनीननी भारत व अत्तार समाजाला एक मोठी भेट दिली आहे. तसेच शिक्षणतज्ञ् गुलाम साकीब सरांनी नाजनीन फातिमाला तिच्या यशा बद्दल अभिनंदन केले व पुढील शिक्षण सुरु ठेवण्याची विनंती केली. नावीद सिद्दीकी सरांनी नाजनीन फातिमाला पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास सुचवले.
यावेळी अत्तर वेलफेअर ट्रस्टचे प्रवक्ते मौलाना तारिक अन्वर अशरफी म्हणाले की डॉ नाजनीन फातिमावर अत्तार समाजाला अभिमान आहे. समाजातील हुशार व गरजू विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे फार महत्वाचे आहे जेणेकरुन नवीन पिढी मार्ग शोधू शकेल आणि राष्ट्र व समाजाच्या विकासाठी हातभार लावेल.अत्तार वेलफेअर ट्रस्ट च्या माध्यमातून आम्ही समाजात शिक्षणाबद्दल जागृती करण्याचा काम करत आहे, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्ये पुरवणे व त्यांना प्रोत्साहित करणे हाच ट्रस्टचा काम आहे.
या वेळी डॉक्टर इमरान सर (हेड कंप्यूटर डिपार्टमेंट मिल्लिया महाविद्यालय बीड़), शिक्षणतज्ञ् गुलाम साकिब सर, नवीद सिद्दीकी सर (यूपीएससी गाइड),जावेद भाई अत्तार, अत्तार वेलफेयर ट्रस्टचे अध्यक्ष आबेद अत्तार उपाध्यक्ष शाकेर अत्तार,जनरल सेक्रेट्री अकबर अत्तार,परवेज अत्तार व इतर उपस्थित होते.