राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील 47 लाभार्थींना धनंजय मुंडेंच्या हस्ते प्रत्येकी 20 हजारांचे धनादेश वितरित*
परळी (दि. 07) —- : परळी येथील दारिद्र्य रेषेखालील 47 कुटुंबांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ देण्यात आला असून, या 47 जणांना प्रत्येकी 20 हजार रुपये अर्थ सहाय्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांस एक रकमी 20 हजार रुपयांची मदत या योजनेंतर्गत करण्यात येते. दरम्यान 47 कुटुंबातील वारसांना प्रत्येकी 20 हजार रुपयांच्या धनादेशांचे ना. मुंडेंच्या हस्ते आज परळीतील चेमरी रेस्ट हाऊस येथे वितरण करण्यात आले आहे. यावेळी सर्व लाभार्थींना एक एक वृक्ष भेट देण्यात आले असून त्या वृक्षाचे संवर्धन करावे असे आवाहनही केले आहे. या कार्यक्रमास ना. मुंडे यांच्या सह जि. प. गटनेते अजय मुंडे, न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, दीपक नाना देशमुख, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, राजाभाऊचाचा पौळ, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार रुपनर, अनंत इंगळे, रवींद्र परदेशी यांसह आदी उपस्थित होते.