LatestNewsबीड जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आँनलाईन नौकरी महोत्सव ; धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली – डॉ.संतोष मुंडे

परळी : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी तालुक्यातील बेरोजगार युवक व युवतींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिनानिमित्ताने होणाऱ्या आँनलाईन नौकरी महोत्सवाचा व रोजगाराच्या या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे.
देशात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी मुळे नागरिक चिंताग्रस्त आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणारे, रोजंदारी, कष्टकरी कामगार व गोरगरीब जनता यामुळे मोठ्या अडचणीत सापडली आहे, त्यांचा रोजगार बंद झाला आहे.त्यामुळे हातावरचे पोट असणार्‍या मजुरांना जगणे मुश्कील झाले आहे.हाताला काम नाही त्यामुळे मिळकत कुठुन अशात कुटुंबांचा ऊदरनीर्वाह तरी कसा करायचा असा एक प्रश्न गरीबांसमोर ऊभा झाल्याने व रोजगार उपलब्ध नसल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिनानिमित्ताने होणाऱ्या आँनलाईन नौकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात १० जून १९९९ रोजी स्थापन झालेला राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष येत्या १० जून रोजी २१ वा वर्धापनदिन साजरा करीत आहे. कोरोना संकटामुळे हा वर्धापनदिन सार्वजनिकरित्या व मोठ्या प्रमाणावर साजरा करता येत नसला तरी वर्धापनदिनाच्या निमित्ताने आपली सामाजिक बांधिलकी पार पाडण्याची गरज आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापनदिनानिमित्त ‘ऑनलाईन नोकरी महोत्सव’ अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार युवक- युवतींना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर असंख्य परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर झाल्यामुळे औद्योगिक कंपन्यांनाही मनुष्यबळाची आवश्यकता आहे. या परिस्थितीत राज्यातील युवकांनी आळस झटकून या रोजगारसंधी स्वीकारण्यासाठी स्वतःहून पुढे आले पाहिजेत . कष्ट करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम करण्याची संधी नक्कीच मिळेल. इच्छूक बेरोजगार युवकांनी खाली दिलेल्या गुगल ड्राइव्हच्या
https://forms.gle/xikubng6MBGTpPgp8 या लिंकवर क्लिक करून नावनोंदणी करावी. तसेच 9822280568 या नंबर संपर्क साधावा. तसेच या उपलब्ध होणाऱ्या रोजगार संधी प्राप्त करून घेण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी मतदारसंघातील गरजू बेरोजगार युवक-युवतींनी पुढे यावे असे आवाहन ‘राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *