राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेल च्या बीड जिल्हा निरीक्षक पदी समद बागवान!
मुंबई (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेल च्या बीड जिल्हा निरीक्षक पदी समद बागवान यांची निवड करण्यात आली.
जालना येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते समद बागवान यांचे कार्य पाहून त्यांना राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे बीड जिल्हा निरीक्षक पद देऊन नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांची निवड अल्पसंख्यांक सेलचे राज्याध्यक्ष ॲड. मोहम्मद खान पठाण यांनी केली. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या पदासाठी निवड केल्याबद्दल समद बागवान यांनी राष्ट्रवादी पक्ष तसेच सर्व नेते आणि ॲड. मोहम्मद खान पठाण यांचे आभार व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.