राष्ट्रचेतना महायज्ञास सोनपेठ येथे सुरुवात…!

सोनपेठ/मंजूर मूल्ला : राष्ट्रसंत भय्युजी महाराज यांच्या पुण्य स्मरणार्थ सूर्योदय परिवाराच्या वतीने राष्ट्रचेतना महा यज्ञास रक्तदानाने सुरुवात करण्यात आली.

राष्ट्रसंत भय्युजी महाराज यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त सोनपेठ येथे जिल्हा रुग्णालय व सक्षम परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून राष्ट्र चेतना महायज्ञास सुरुवात करण्यात आली.

राष्ट्र उभारणीच्या कामात युवकांचा सहभाग असावा यासाठी राष्ट्रसंत भय्युजी महाराज यांच्या प्रेरणेने सोनपेठ येथे सूर्योदय परिवाराचे काम सुरू आहे. महाराजांच्या द्वितीय पुण्य स्मरणार्थ विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन ता.१२ रोजी करण्यात आले होते.

राष्ट्रसंत भय्युजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून या महा यज्ञाची सुरुवात रक्तदानाने झाली. सोनपेठ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. यावेळी त्यांनी रक्तदान करून या शिबिराचे उदघाटन केले. यावेळी उद्धव देशमुख, सुहास देशमुख, कृष्णा पिंगळे, शिवमल्हार वाघे, ज्ञानेश्वर बोबडे, सय्यद खदीर,बाबासाहेब गर्जे,गणेश पाटील,सुभाष सुरवसे, धनंजय देशमुख, रवींद्र देशमुख, मीरा बहेनजी, प्रणिता लोंढे आदीची उपस्थिती होती.

या शिबिरात पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात प्रामुख्याने महिला रक्तदात्यांचा मोठा सहभाग होता. तसेच पहिल्यांदाच रक्तदान करणाऱ्या तरुण मुलांचाही सहभाग होता. तसेच यावेळी उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना कोरोना प्रतिबंधक होमिओपॅथी औषध आर्सेनिक आल्बम डॉ. राजगोपाल राठी यांच्या हस्ते देण्यात आले.

तसेच यावेळी सूर्योदय परिवाराच्या वतीने सोनपेठ पोलीस ठाण्याच्या आवारात सहायक पोलिस निरीक्षक श्रीनिवास भिकाने यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

या रक्तदान शिबिरासाठी जिल्हा रुग्णालय, रक्तपेढीचे माधव गोचडे,मारोती शिरगावकर, दिपक कदेरे तसेच सक्षम संस्थेचे डॉ. भगवान देशमुख, राकेश मेहता, अमोल पांडे तसेच सूर्योदय परिवाराचे सुधीर बिंदू, जनसेवक कृष्णा पिंगळे, तुषार देशमुख, देवेंद्र देशमुख, सोमनाथ नागुरे,सतीश हंचाटे,गौस कुरेशी आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *