रायमोह येथील राष्ट्रवादी युवक बांधवांची मागणी ; रा.यु.कॉं चे प्रदेशअध्यक्ष महेबूब शेख यांना विधानपरिषदेवर आमदार करा…!
शिरूर : महाराष्ट्रातील तमाम राष्ट्रवादी युवक बांधवांच्या वतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष महेबुब (भाई) शेख यांना विधान परिषदेवर घ्यावे युवक वर्ग यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आहे. श्री महेबुब भाईच आता त्यांना न्याय देऊ शकतात. महाराष्ट्रातील सर्व तरुण बांधव महेबुब भाईच्या विचारांना मानणारा असल्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ला ह्याचा नक्किच फायदा होणार आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी युवक बांधवांचेच म्हणने नसुन अठरा पगड जातीच्या लोकांनमधून आवाज येत आहे कि चांदा ते बांदा गडचिरोली ते कोल्हापूर पर्यंत राष्ट्रवादी युवक च्या माध्यमातून पक्षाचे विचार व देशाचे नेते महाविकास आघाडी चे चाणक्य आदरणीय खासदार मा श्री शरद पवार साहेबांचे विचार खेड्या पाड्यात पोहचण्याच काम ह्या “ध्येयवेड्या नवतरुणाने” केले आहे. ह्या अलिकडच्या काळात कोरोणाच आस्माणी संकट आले असताना गरिबांना अन्न धान्य स्वत:च्या स्वखर्चातुन सामाजीक बांधिलकी म्हणुन मदत केली आणि संपुर्ण महाराष्ट्रातील युवकांच्या माध्यमातून माझं कुटुंब माझा महाराष्ट्र ह्या संकल्पनेतुन मुख्यमंत्री साह्यता निधीसाठी सर्व युवक ने मदत केली .असे अनेक कामं आहेत ते वर्णन करता येणार नाही पण जर आदरणीय खासदार “सुप्रिया ताई सुळे” आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आदरणीय “दादा” यांनी अशा खमक्या गरिब तरुणाना विधान परिषदेवर पाठवावे ही तरुण वर्गांची मागणी आहे.
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी युवक बांधव हे आपल्या विचारावर प्रेम करणारे आहेत . मा.सुप्रियाताई, मा. जयंत पाटील साहेब मागील 22 वर्षांपासुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व प्रदेशाध्यक्ष पदाचे अतिशय प्रामाणिक आणि अत्यंत जबाबदारीने काम सांभाळत आहेत. आणि त्याचबरोबर त्या स्टार प्रचारक.व अभ्यासू सुध्दा आहेत.श्री. महेबुब शेख आजच्या युवा पिढीसमोर एक आदर्श ठेवला आहे. पक्ष संघटन वाढीसाठी त्यांचे खूप मोठे योगदान आहे.सध्या राज्यात पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यासह पक्षाला बळ देण्याचेही काम करत आहेत. पक्षश्रेष्ठीनी विचार करावा. आणि त्यांच्या याच आदर्शासमोर आम्ही आजची युवा पिढी घडत आहोत.महेबुब भाई स्वतः वकील असताना त्या महीना लाखो रूपये पगार असलेली नोकरी करू शकल्या असत्या पण त्यांनी तस न करता आजच्या या स्थितीला राजकारणातुन समाजसेवा करण्याची ही संधी पक्षाच्या वतीने निश्चीतच भेटली तसीच आणखीन एक संधी आज आपण महेबुब (भाई) शेख यांना द्यावी ती म्हणजे. विधानपरिषदेवर आपण महेबुब भाई यांची निवड करावी. कारण महाराष्ट्रातील युवक हा आदरणीय महेबुब (भाई) शेख या एका अभ्यासू आणि तरूण नेत्याची गरज आहे समस्त महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने आपणाला विनंती करत आहोत .राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामान्य युवकला एक संधी द्यावी आणि विधान परिषदेवर घ्यावे ही रायमोह येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आकाश सानप,अमर सानप,सोहेल शेख ,उमर सैय्यद ,शोएब शेख, लियाकत शेख ,अज़रोद्दिन शेख ,राजू शेख ,अमोल गायकवाड,कैलास गायकवाड,अशोक,गायकवाड,लक्ष्मण गायकवाड,संदीप जाधव ,सचिन गायकवाड,अनिल जाधव,उमेश गायकवाड ई मागणी केली आहे.