राज्य महसूल वृद्धी करीता राज ठाकरेंनी केलेल्या मद्य विक्रीच्या मागणीमुळे तळीरामांची उत्सुकता शिगेला… तळीरामांच्या नजरा अहोरात्र दारूच्या दुकानांकडे !
बोरघर माणगांव : शासनाने संपूर्ण देशासह राज्यात कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदी मुळे संपूर्ण देशासह राज्यातील सर्व व्यवसाय, उद्योग धंदे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे देशासह राज्याचा महसूल पुर्णपणे बुडाला आहे. त्यामुळे देशासह राज्याची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. देशासह राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी प्रदान करण्यासाठी लाॅकडाऊन कालावधीत बंद करण्यात आलेली मद्य तथा दारू विक्री सुरू करण्यात यावी अशी मागणी मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांनी राज्याच्या महसूलात वृद्धी व्हावी या उद्देशाने राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धव जी ठाकरे यांच्याकडे केली आहे. मनसे अध्यक्ष माननीय श्री. राज ठाकरे यांनी दारू विक्री सुरू करण्या संबंधी केलेल्या मागणी मुळे तमाम तळीरामांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यामुळे तळीरामांचे डोळे अहोरात्र दारूच्या दुकानांकडे लागून राहिले आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदी मुळे देशासह राज्यात सर्वत्र सर्व प्रकारच्या दारू विक्रीकर कायदेशीर निर्बंध आले आहेत. कुठेही दारू मिळत नसल्यामुळेतमाम तळीरामांच्या घशाला कोरड पडली आहे. त्यामुळे एकच प्याला साठी त्यांची अवस्था कुठं कुठं शोधू तीला… अशी झाली आहे. तळीरामांना हवा आहे बस्स मदिरेचा एकच प्याला… तळीरामांना लाॅकडाऊन संचारबंदी कालावधीत कुठेही दारू मिळत नसल्याने त्यांनी दारूची तहान भागविण्यासाठी नवनवे अघोरी प्रयोग सुरू केले आहेत. दारूची तलफ पुर्ण करण्यासाठी त्यांनी नाना प्रकारचे उपद्व्याप सुरू झाले आहेत. या मध्ये प्रामुख्याने हॅन्ड सॅनिटाइजर, व्हाईटनर, घरातल्या घरात दारू तयार करण्याचे प्रयत्न असे अनेक प्रकार समोर येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यापासून अत्यावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने बंद असून त्यात यात दारुच्या दुकानांचा देखील समावेश आहे. दारुची दुकाने बंद असल्यामुळे तळीरामांची पूरती गोची झाली आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी चोरट्या पद्धतीने दारू विक्री सुरू असल्याची उदाहरणे समोर आली आहेत. या सर्व प्रकारामुळे देशासह राज्याचा महसूल बुडत आहे. महसूल बुडाल्याने देशासह राज्याची अर्थव्यवस्था पार खिळखिळी होत चालली आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी मद्य विक्री मधून मिळणारा महसूल या परिस्थितीत मद्य विक्री चांगला पर्याय ठरू शकतो या उद्देशाने मनसे अध्यक्ष माननीय श्री राज ठाकरे यांनी केलेली मद्य विक्रीची मागणी आणि या मागणीमुळे तळीरामांची इच्छापुर्ती पुर्ण होते की नाही हे पाहणे सर्वांसाठी औत्सुक्याचे झाले असले तरी दुसरीकडे या मागणीमुळे तमाम तळीरामांच्या आशा पल्लवित झाल्या असून त्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यामुळे आता तमाम तळीरामांच्या नजरा अहोरात्र दारूच्या दुकानांकडे लागून राहिल्या आहेत.